भूतरामनहट्टी येथील श्री भगवान महावीर जैन शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका निशा राजेंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका अरुणा शहा आणि सुधर्म मुडलगी उपस्थित होते. प्रारंभी व्यासपीठावरून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आल्यानंतर उपस्थित क्रीडापटूंनी वाद्य वृंदाच्या तालावर शिस्तबद्ध पथसंचलनाद्वारे पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रमुख खेळाडूंनी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत स्वीकारून मुख्य क्रीडा ज्योत प्रज्वलित केली तत्पूर्वी शाळेचे उदयोन्मुख धावपटू किरण, आदित्य, समीक्षा आणि प्रतीक या खेळाडूंनी क्रीडा ज्योत मैदानाभोवती फिरवली. क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आल्यानंतर क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. क्रीडा महोत्सवातील 100 मी. धावण्याच्या शर्यतीत माध्यमिक मुलांच्या गटात कार्तिक पाटील याने प्रथम आणि ऋषिकेश याने द्वितीय क्रमांक तर मुलींच्या गटात सूची पाटील हिने प्रथम व सिद्धी देमण्णाचे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. 200 मी. धावण्याच्या शर्यतीत आदित्य पाटील याने प्रथम आणि स्वप्निलने द्वितीय तर मुलींच्या गटात समीक्षा एम. हिने प्रथम व संजना एच. हिने द्वितीय क्रमांक मिळवला मुलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत कार्तिक याने प्रथम व प्रतिक कुमाण्णाचे याने द्वितीय क्रमांक पटकावला. 4×100 मी. रिले शर्यत मुलांच्या गटात यलो हाऊसने तर मुलींच्या गटात रेड हाऊसने जिंकली. याव्यतिरिक्त क्रीडा महोत्सवात अन्य विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सदर क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जोसेफ परेरा व सुनील देसाई यांच्यासह शाळेच्या शिक्षक वर्गाने विशेष परिश्रम घेतले