No menu items!
Friday, August 29, 2025

कावळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मिरवणूक आज

Must read

बेळगाव, ता. कावळेवाडी (ता. बेळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या पुतळ्याची मिरवणूक 26 मे रोजी बेळगाव शहरातून आयोजित करण्यात आली आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून 9 वाजता मिरवणूक सुरुवात होईल. गणेशपुरमार्गे मिरवणूक निघणार आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते ११ जून रोजी सकाळी ११ वाजता या मूर्तीचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. माजी जि. प. सदस्य मोहन मोरे यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम होत आहे.

मूर्तीची मिरवणूक वाजत गाजत काढली जाणार आहे. या कार्यक्रमाला आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश कवठगीमठ, माजी आमदार अनिल बेनके, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी आमदार परशुराम नंदीहळळी, धनंजय जाधव, विनय कदम, किरण गावडे, आनंद आपटेकर, हिरामणी मुचंडी, सुनील जाधव, आनंद चव्हाण, मललेश चौगुले, सिद्धाप्पा कांबळे, डॉक्टर रवी पाटील
यांच्या उपस्थितीत मिरवणूक सोहळा होणार आहे.

मूर्ती स्थापना सोहळ्याला कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, गोवा येथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर, माजी मुख्यमंत्री बसवराज बोंमइ, खासदार मंगला अंगडी, खासदार इराणा कडाडी, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, हिंडलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष श्री. नागेश मंनोळकर, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, आमदार विठ्ठल हलगेकर, आमदार भालचंद्र जारकीहोळी, आमदार रमेश जारकीहोळी यांची उपस्थिती असेल. त्यानंतर कीर्तन प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमही पार पडणार आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!