बेळगाव
सध्या शहरातील तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यातही जे आधार केंद्रे आहेत यातून 18 वर्षावरील मुली बेपत्ता झाल्या आहेत. येथील सदाशिवनगर मधील समृद्दी सेवा स्फूर्ती स्वाधार गृह आश्रय केंद्रातून एक युवती बेपत्ता झाली आहे. तिचे नाव मेघा मल्लाप्पा हरबर असे असून ती 22 वर्षाची आहे. तर शाहूनगर दुर्गामाता गल्ली येथील शारदा माता स्वाधार गृहातून भुनेश्वरी महादेव अज्जानावर वय 19 ही युवती बेपत्ता झाली असून एपीएमसी स्थानकात याबाबत तक्रार करण्यात आली आहे. तसेच नंदन धाम केंद्रात उपचार घेणारी शिमोगा येथील तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार एपीएमसी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे मंजुळा राजू वय 17 असे तिचे नाव असून तिला कन्नड भाषा बोलता येते. या बेपत्ता झालेल्या युवती शहरात कोठेही आढळल्यास एपीएमसी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.