मुलांना मातृभाषेची ओढ लागावी व आपल्या भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सरकारी हायर प्राथमिक मराठी शाळा बंबरगे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष कल्लाप्पा डोंबले तसेच युवा समिती तालुकाप्रमुख मनोहर हुंदरे तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते दिग्विजय पाटील,जोतिबा कडेमणी तानाजी कोले,बळवंत कोले, मुख्याध्यापिका श्रीमती कौलगे टीचर,बेन्नाळकर सर,मामणी टीचर,तसेच शाळा सुधारणा कमिटीचे सर्व सदस्य सदस्या उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कोकितकर यांनी केले यावेळी मनोहर हुंदरे यांनी आपले मनोगत मांडताना युवा समितीच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच मराठी शाळा आणि मराठी भाषा टिकावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली तसेच जोतिबा कडेमणी यांनी युवा समितीचा हा उपक्रम खरोखरच उल्लेखनीय असून मराठी भाषेसाठी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी युवा समिती सातत्याने प्रयत्न करते त्यामुळे भविष्यात या रोपट्याचे मोठा वृक्ष होणार यात शंका नाही यासाठी युवा समितीचे आभार मानले तत्पूर्वी कौलगे टीचर यांनी प्रास्ताविक केले तर उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी बेन्नाळकर सर यांनी आभार मानले
युवा समितीच्या वतीने बंबरगा येथील शाळेत केले शैक्षणिकसाहित्य वाटप
