हलगा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थ्यांनी कु. मंगल केदारी संताजी हिची राज्य पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे.
बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सरकारी प्राथमिक मराठी शाळा हलगा शाळेची विद्यार्थ्यांनी मंगल केदारी संताजी हिने 80 मी. अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सदर यशामुळे तिची राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. याबद्दल तिचा सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा डीएसपी सुरेखा मिर्जी, बेळगाव शहर पीईओ जे. बी. पटेल, बेळगाव ग्रामीणचे पीईओ एन. एफ. चक्रसाली, हलगा शाळेचे शारीरिक शिक्षक अन्वर लंगोटी, शैलजा भोसले आदी उपस्थित होते. राज्यस्तरीय निवडीबद्दल मंगल संताजी हिचे शाळेसह गावात अभिनंदन होत आहे.