माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात येऊ नये तसेच वाल्मिकी समाजाला 7.5 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी वाल्मिकी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली .
तसेच यावेळी पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर वाल्मिकी समाजाने ताशेरे ओढत हल्लाबोल केला. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत वाल्मिकी समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला
तसेच बोम्माई सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारने वाल्मीकी समाजाला केवळ खोटी आश्वासने देऊन वेळकाढूपणा धोरण अवलंबिल्याचे सांगितले. तसेच येत्या तीन महिन्यात वाल्मिकी समाजाला आरक्षण जाहीर न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वाल्मिकी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला