कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल शालेय मंत्रिमंडळातर्फे आयोजित ‘क्रोनोस 2के23 व्ही9.0’ हा शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींमध्ये प्रतिभा, संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडविणारा स्पर्धात्मक महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. बेळगावच्या केएलई इंटरनॅशनल स्कूलने या क्रोनोस -2023 महोत्सवाचे सर्वसाधारण अजिंक्यपद, तर डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलने उपविजेतेपद पटकाविले.
सेंटपॉल्स हायस्कूल येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सिमला हिमाचल प्रदेशचे डेप्युटी अकाउंटंट जनरल शाळेचे 2006 मधील माजी विद्यार्थी प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले होते. ‘क्रोनोस 2के23 व्ही9.0’ महोत्सवात बेळगाव शहर परिसरासह गोवा येथील अशा एकुण 12 शाळांमधील विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सहभाग होता. सदर महोत्सवा अंतर्गत गायन, नृत्य, कला, उद्योजकता, मास्टर अँड मिस, स्टँड अप कॉमेडी, मेंटोर्स चॅलेंज, वक्तृत्व सिनेमॅटोग्राफी, प्रश्नमंजुषा वगैरे विविध स्पर्धांचा समावेश होता. सदर स्पर्धांचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. कला स्पर्धा :1) सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव, 2) डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव, 3) चूब्बी चिक्स स्प्रिंग व्हॅली हायस्कूल गोवा. सिनेमेटोग्राफी स्पर्धा :1) ज्ञान प्रबोधन मंदिर स्कूल बेळगाव, 2) सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव, 3) केएलई इंटरनॅशनल स्कूल बेळगाव. वक्तृत्व स्पर्धा :1) केएलई इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, 2) सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव, 3) डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव. समूह नृत्य स्पर्धा :1) एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूल बेळगाव, 2) केएलई इंग्लिश मीडियम स्कूल बेळगाव, 3) केएलई इंटरनॅशनल स्कूल बेळगाव. उद्योजकता स्पर्धा :1) ज्ञान प्रबोधन मंदिर बेळगाव, 2) जैन हेरिटेज स्कूल बेळगाव, 3) डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव. सामूहिक गीत गायन स्पर्धा :1) चूब्बी चिक्स स्प्रिंग व्हॅली हायस्कूल गोवा, 2) केएलई इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, 3) ज्ञानप्रबोधन मंदिर बेळगाव. कॉस्मिक ट्विस्ट स्पर्धा :1) एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूल बेळगाव, 3) केएलई इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, 3) जैन हेरिटेज स्कूल बेळगाव. स्टँड अप कॉमेडी स्पर्धा : 1) डिवाइन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव, 2) सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव, 3) लव्ह डेल सेंट्रल स्कूल बेळगाव. मास्टर अँड मिस स्पर्धा : एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूल बेळगावचा कु. ईशान नाडकर्णी ठरला ‘मास्टर क्रोनोस 2के23’ किताब विजेता, त्याचप्रमाणे डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट स्कूल बेळगावची कु. सचि पाटील ठरली ‘मिस क्रोनोस 2के23’ किताब विजेती. प्रश्नमंजुषा स्पर्धा : केएलई इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, 2) केएलएस इंग्लिश मीडियम हायस्कूल बेळगाव, 3) डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव. मेंटोर्स चॅलेंज स्पर्धा :1) केएलई इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, 2) जैन हेरिटेज स्कूल बेळगाव, 3) चूब्बी चिक्स स्प्रिंग व्हॅली हायस्कूल गोवा.
क्रोनोस 2के23 महोत्सवाच्या गेल्या 31 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या सांगता समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून व्हॅटिकन वेधशाळेचे नामवंत खगोल शास्त्रज्ञ फादर रिचर्ड डिसोजा एसजे यांच्यासह सन्माननीय अतिथी म्हणून केएलई इंग्लिश मीडियम स्कूल बेळगावच्या प्राचार्या नंदिनी मुतालिक -देसाई आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे सहाय्यक संचालक पियुष सेंटीयागो तसेच सेंटपॉल हायस्कूल व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याबरोबरच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी सेंटपॉल्स हायस्कूलच्या मंत्रिमंडळासह शिक्षक वर्ग व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.