प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाण्याची प्रत्येक रामभक्तांची इच्छा आहे. देशातील विविध भागांतून प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी भाविक वेगवेगळ्या मार्गाने निघत आहेत. रामभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी बेळगावहून अयोध्येसाठी रेल्वे सुरु व्हावी अशी मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेता आणि रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भारतीय रेल्वेने स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
बेळगावहून अयोध्येसाठी ‘स्पेशल आस्था ट्रेन’ सेवेचा शुभारंभ शनिवारी १६ फेब्रुवारी हुक्केरी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते झाला. यावेळी बजरंग दलचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर सकाळी 10.30 वाजता बेळगावातील रेल्वे स्टेशनमधून अयोध्येसाठी ट्रेन रवाना झाली.
या मिशन अंतर्गत आज जवळपास एक हजार तिनशे तत्तीस भाविकांना अयोध्येतील प्रभू श्री रामाचं दर्शन घडवण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये एकूण ५००० प्रवासी क्षमता असणार आहे.