कडोली : येथील मराठी साहित्य संघ व राज्य मराठी विकास संस्था, मुंबईतर्फे दि. २५ रोजी सकाळी ११ वा. कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील साहित्य संघाच्या कार्यालयात ही स्पर्धा होईल. स्पर्धा शालेय (दहावीपर्यंत) व खुला गट अशा दोन गटात आहे. कथाकथनासाठी शालेय गटासाठी ७ आणि खुल्या गटासाठी १० मिनिटे वेळ आहे. कथेसाठी विषयांचे बंधन नाही. मात्र कथा धार्मिक, राजकीय टिका किंवा अंधश्रद्धा पसरविणारी नसावी. दोन्ही गटासाठी स्वतंत्र बक्षिसे आहेत. नाव नोंदणी दि. २४ डिसेंबरपर्यंत करणे बंधनकारक आहे. कोणालाही दोनवेळा प्रवेश दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी बसवंत शहापूरकर (९९००२९५२००) किंवा अरुण पाटील (९४४८०३१३६१) यांच्याशी संपर्क साधावा.