बुधवारी १४ तारखेला मकर संक्रांती असल्याने तिळगूळ खरेदीला प्रारंभ झाला आहे. नवीन वर्षातील पहिला सण असल्याने उत्साहवर्धक वातावरण आहे. शहर उपनगरात विविध ठिकाणी मांडलेले स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत.बाजारपेठेत विविध रंगीबेरंगी तिळगूळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, तीळ भाकरी, गूळ पोळी यासह अन्य विविध पदार्थांची खरेदी केली जात आहे. महिलांनी घरासमोर किंवा बाजारपेठेत तिळगुळाचे स्टॉल मांडले आहेत. साखरेच्या किमती वाढल्याने यंदा तिळगुळाचे दरही वाढले आहेत. ठिकठिकाणी आकर्षक तिळगूळ लक्ष वेधून घेत आहे.
गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, रविवार पेठ, खडेबाजार, काकतीवेस,
सुगडीसह हलव्याच्या दागिन्यांना पसंती
मकर संक्रांतीच्या काळात महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. संक्रांतीला सुवासिनींना वाण देण्याची प्रथा आहे. यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी होत आहे. संक्रांतीच्या पूजेसाठी सुगडी खरेदीलाही पसंती मिळत आहे. यामध्ये हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या लोंब्या आणि तीळ-गूळ भरुन पूजा केली जाते. साखरेच्या बनवलेल्या हलव्यापासून दागिन्यांनाही मागणी आहे.
किर्लोस्कर रोड आदी ठिकाणी भोगी आणि मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या साहित्याची रेलचेल पाहावयास मिळत आहे. यंदा तिळगूळ दरात किलोमागे २० रुपयांनी वाढ झाली आहे. अन्य साहित्यातही दरवाढ झाल्याने यंदा संक्रांतीला महागाईची झळ बसली आहे. लहान मुलांसाठी डबे आणि तिळगूळ विक्रीसाठी ठेवले आहेत



