एपीएमसी पोलिसांनी बॉक्साईट रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या एका जुगारी अड्यावर छापा टाकून चौघा जणांना अटक केली आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून ३ हजार ८०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बॉक्साईट रोडवर अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी अचानक छापा टाकून समीर पठाण (वय ३२) राहणार शाहूनगर, बबन
जोशी (वय ३६) राहणार कंग्राळी खुर्द, सलीम लष्करवाले (वय ४५) राहणार गांधीनगर, इलियास पठाण (वय ४०) राहणार काळी आमराई अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर एपीएमसी पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत आहे. एफआयआर दाखल करण्यात आला



