आझमनगर येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. त्या युवकाच्या आईने संशय व्यक्त केला आहे.
सुभानसाब रसूलसाब जमादार
(वय ३६) राहणार आझमनगर असे त्या युवकाचे नाव आहे. बुधवारी एका कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सुभानसाब व त्याची पत्नी बाहेर गेले होते. दाम्पत्यातील भांडणानंतर या युवकाने आपले जीवन संपविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक यु. एस. आवटी पुढील तपास करीत आहेत



