काकतीजवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात
वाहनाच्या धडकेत अनोळखी तरुण ठार झाला. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास महामार्गावर काकतीजवळील पौर्णिमा बारजवळ हा अपघात झाला. सदर वाहन बेळगावहून संकेश्वरकडे मृताच्या डाव्या हातावर कन्नडमध्ये वसंत लिहले होते. यावेळी सदर लिहिले आहे. तरुण बहुदा महामार्ग ओलांडत होता. मध्यरात्रीच्या सुमारास वाहन चालकाला त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वाहनाची त्याला धडक बसली. डोकीला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मृत पावला. त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. मृताच्या डाव्या हातावर कन्नडमध्ये वसंत अशी अक्षरे कोरलेली आहेत. काकती पोलिसात नोंद झाली असून या व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क (०८३१- २४०५२०३ अथवा ९४८०८०४११५) साधावा, असे आवाहन केले आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी ठार



