मोफत आरोग्य तपासणी चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल देवालय ट्रस्ट तर्फे रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये सांधेदुखी कंबर दुखी मान दुखी फ्रॅक्चर हार्ड संधिवात संधीरोग हाडांची झीज व ठिसूळपणा गुडघेदुखी जोडदुखी व मणक्याच्या हाडांची तपासणी इत्यादीवर तपासणी करून सल्ला देण्यात येणार आहे या शिबिरात नमह आर्थोकेअर सदाशिव नगर बेळगावचे डॉक्टर रोहन उदय किल्लेकर एम एम बी बी एस एम एस .व डॉक्टर पुजा रोहन किल्लेकर एमबीबीएस एम एस हे हाडांच्या रोगावरील तज्ञ डॉक्टर आपल्या सहकार्यासमवेत तपासण्या करणार आहेत बेळगावा तील संबंधित रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन जालगार मारुती देवस्थान ट्रस्ट चव्हाट गल्ली बेळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे



