शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त महापालिका आयुक्तांना सूचना केल्या आहेत. दोन दिवसांत हिरेबागेवाडी येथील नसबंदी केंद्र सुरू होईल, अशी माहिती आमदार राजू सेट यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. आझादनगर येथे दोन वर्षांच्या बालकावर चार मोकाट कुत्र्यांनी हल्ला
करून गंभीर जखमी केले. या जखमी बालकांची भेट आमदार सेट यांनी घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे महिला आणि बालकांवर हल्ले होत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने हिरेबागेवाडी येथे निवारा शेड उभारले आहे. दोन दिवसांत मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्यात येईल. कुत्र्यांच्या समस्येबाबत मनपा आयुक्त कार्तिक एम. यांच्याशी चर्चा केली असून बंदोबस्ताच्या सूचना करण्यात आल्या आहेत



