सांबरा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई हे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. रचना गावडे, कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीचे माजी उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, सांबरा ग्राम पंचायत सदस्य विक्रम सोनजी, बेळगाव लाईव्हचे प्रतिनिधी संजय चौगुले, बाळेकुंद्री खुर्द येथील सीआरपी एस. वाय. कुंभार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन पार पडले. शाळेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रचना गावडे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. मुख्याध्यापिका ए. ए. पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकारचे मॉडेल मांडले होते.
यावेळी सांबरा एसडीएमसी अध्यक्ष मोहन हरजी, उपाध्यक्षा सुनीता जत्राटी, सदस्य दीपक जाधव, लक्ष्मण जोई, यल्लाप्पा हरजी, दीपाली धर्मोजी, पूजा लोहार, रेशमा हुच्ची, शिक्षक आर. बी. लोहार, आर. बी. मगदूम आदींसह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एस. कंग्राळकर यांनी केले तर आभार ए. बी. पागाद यांनी मानले.