“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”, “विचार बदला नशिब बदलेल, “तुमचे भाग्य तुमच्या विचारात”, “प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय, कारण देवासकट सर्वकाही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नांत आहे” अशा प्रकारचे तेजस्वी क्रांतीकारक विचार देऊन अखिल विश्वमानवामध्ये जागृती निर्माण करणारे विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव पै यांचे ५० ते ६० अनुयायी आपल्या बेळगाव व आसपासच्या तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर रोजी येणार आहेत.
विद्यार्थी मार्गदर्शन अभियान, सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली गेली अनेक दशके विनामुल्य राबविला जात आहे. सर्व स्तरांतील लोकांपर्यत जीवनविद्यारूपी जीवन संजीवनी पोहचविणे, तसेच हे जग सुखी व्हावे आणि आपले हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व प्रगत राष्ट्रांच्याही पुढे जावे हे सद्गुरुंचे दोन संकल्प सिद्धिस नेणे यासाठी जीवनविद्या मिशन विविध उपक्रमांद्वारे सतत कार्य करीत आहे. विद्यार्थी हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत, हे लक्षात घेऊन मुलांनी चांगला अभ्यास करुन उत्तम यश कसे संपादन करावयाचे याचे योग्य मार्गदर्शन करुन नितीमुल्यांची शिकवण जीवनविद्या मिशनचे हे अभियान विविध विषया मार्फत सदर ठीकाणी ३ दिवस करणार आहे.
आजचा विध्यार्थी हा उद्याचा नागरीक असल्याने त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, म्हणुन जीवनविद्येचे हे मौलिक मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे व हे विद्यार्थी राष्ट्राचे उत्तम नागरीक व्हावेत हीच आमची संकल्पना आहे म्हणून जीवनविद्या मिशन हा उपक्रम विनामुल्य व समाजसेवा म्हणून राबवत आहे. सदर कार्यक्रमात ३० ते ५० मिनिटांपर्यंत “अभ्यासाच्या पद्धती व अभ्यासाचे महत्व, शरीराचे महत्व, चांगली संगती व व्यसनांपासून अलिप्ती, राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम, निसर्गनियमांचे जीवनातील महत्वाचे स्थान” या ५ विषयांवर शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी-पालक-शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येते.
अधिक माहिती करीता संपर्कः श्री दिलीप निर्मळ, विदयार्थी मार्गदर्शन अभियान प्रमुख , मुंबई. मो. : ९८७०३१०१३७