बेळगुंदी येथील बालवीर सोशल फौंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतनमध्ये पालघर येथील गोष्टरंगच्या टीमने बांबू ,हाकांचा पुल व पेरू या गोष्टींचे नाट्यरूपात सादरीकरण करून सर्व विद्यार्थी व शिक्षकांची मने जिंकली. सचिन वीर, सायली जोशी आणि गणेश वसावे या टीमने गोष्टीतील पात्रे हुबेहूब रंगवून विद्यार्थ्यांचे मनोरंजन तर केलेच त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांच्या भाषा विकासाला चालना दिली . तसेच गोष्टीतील आवडलेल्या विविध घटकांची चित्रे ही विद्यार्थ्यांनी अगदी मनसोक्त साकारली. हा कार्यक्रम श्री आकाश चौगुले सरांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला बालवीर सोशल फौंडेशनचे उपाध्यक्ष श्री शंकर चौगुले सर, गौरीताई चौगुले ,संचालक दशरथ पाऊसकर ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील, शाळेचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमचे सूत्रसंचालन व आभार रेखा शहापूरकर यांनी केले.