No menu items!
Wednesday, February 5, 2025

मुंबई दौरा रोजगार मेळावा

Must read

महाराष्ट्र कर्नाटक सीमा खटला 2004 पासून प्रलंबित असल्याने येथील तरुण वर्ग बेरोजगारात होरळतोय.सीमा भागातील बेरोजगार आणि पिचलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम महाराष्ट्र एकीकरण युवा समिती संघटनेने दोन वर्षांपूर्वी केले होते महाराष्ट्र शासनाकडून १७०० तरुण वर्गाला रोजगाराची संधी देण्याचे यश संघटनेला मिळाले तसेच महाराष्ट्र सरकार आपल्या सीमाभागातील अविरत काम करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते, काही कारणास्तव मागील काही अपर्याय कारणामुळे रोजगार मेळावा होऊ शकला नाही याची खंत होती.. पण या वर्षी रोजगार महामेळावा घेण्यासाठी अवितर काम करीत,नेतांचा मागोवा घेत पुन्हा हालचाली सुरू केल्या…
मान खासदार धर्याशिल माने साहेब,कोल्हापूर पालक मंत्री आबिटकर साहेब यांना ही प्रस्ताव अगोदरच कानी घातला होता त्यांनीही सहमती दर्शवली होती त्यानंतर काल मंगळवार दिनांक ४/२/२०२५ रोजी संघटने मार्फत मुबई दौरा करून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सावंत साहेबांशी भेट घेतली. निपाणी सीमाभागातील रोजगार मेळावा घेण्या करिता निवेदन देण्यात आले. अध्यक्ष पाटील साहेब बोलताना म्हणाले मागील रोजगार मेळाव्यात दरवर्षी सीमाभागात तरुण वर्गासाठी रोजगार मेळावा घेण्याचे अभिवचन दिले होते ते पाळावे यासाठी विनंती केली साहेबांनी यावर लवकरच हालचाली करू.पुढची बैठक ठरऊ तुम्हाला लवकर कळऊ असे आश्वासन दिले…
यासमयी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी विभाग अध्यक्ष जयराम मिरजकर साहेब,महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील साहेब,कपिल बेलवळे,अमर विटे हे हजर होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!