बेळगांव ः ज्येष्ठ नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड ( रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) बेळगांव येथे होणार आहे.
कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्कार समितीतर्फे देण्यात येणारा यंदाचा पहिला पुरस्कार कामगार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अखिल भारतीय आयटक कामगार संघटनेच्या महासचिव कॉम्रेड अमरजीत कौर ( नवी दिल्ली) व कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशिक्षक मारुती घाडी ( बेळगांव) यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन व साक्षरता प्रसार यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे नुकतीच मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर ( कोल्हापूर) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्कार समितीतर्फे करण्यात आले आहे.
,



