बेळगाव : न्यू गांधीनगर येथील एका तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून रात्री माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
झिशान चाऊस (वय १८) राहणार न्यू गांधीनगर असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मुजम्मिल सत्तीगेरी याने हा हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. गुन्हेगारी प्रकरणातून एक महिन्यापूर्वी मुजम्मिल जामिनावर बाहेर पडला होता. पूर्ववैमनस्यातून शुक्रवारी दुपारी झालेल्या वादावादीनंतर त्याने झिशानवर हल्ला केला. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्ढेकर पुढील तपास करीत आहेत



