बेळगाव : किल्ला येथील रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे हिंदू तिथीप्रमाणे १६३ व्या स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शनिवार दि. १० रोजी विविध कार्यक्रम पार पडले .
सकाळी ६.१५ वा. उषा कीर्तन, ८ वा. विशेष पूजा, ९.३० वा. शिवसहस्रनम परायण, १०.१५ वा. होम व वेदघोष, ११.२० वा. भजन, दुपारी १२ वा. प्रवचन, १२.४५ वा. पुष्पांजली व नामसंकीर्तन, दुपारी १ वा. महामंगला आरती व प्रसाद वितरण करण्यात आले तर सायंकाळी ६ वा. भजन, ६.३० आरती आणि स्तोत्र व सायंकाळी ७ वा. भजन व नामावली आदी कार्यक्रम होणार आहेत.
भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.



