मुखवडा पार्ट टू 008 या चित्रपटाचा शुभारंभ आज अरगन तलावा नजीक असलेल्या हिंडलगा गणपती मंदिरात करण्यात आला. यावेळी चित्रपट निर्माते डॉक्टर गणपत पाटील यांच्या हस्ते गणेश पूजन करून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला शुभारंभाला चालना देण्यात आली .
गेल्या वर्षी या चित्रपटाचा पहिला भाग जवळपास कर्नाटक राज्यातील साठ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग मुखवडा टू 008 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवकुमार काडूर हे असून हरीश सारा हे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पहात आहेत.
या चित्रपटात एकूण दहा गाणी असून चार हाणामारीची दृश्ये आह तसेच हा चित्रपट व्यवसायिक स्वरूपाचा असणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला बेळगाव मधून प्रारंभ होत असून पुढे म्हैसूर मडिकेरी कोलार या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपट निर्माते गणपत पाटील यांनी दिली आहे .