दरवर्षी पुणे स्थित शिवाजी ट्रेल ह्या संघटने मार्फत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा सैन्याच्या भारत भर पाऊल खुणा असलेल्या गडांवर, एकाच दिवशी, जास्ती जास्त गडांवर पुजा केली जाते. त्याचाचं भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड किल्ल्याची, सपत्नीक पूजा श्री. सतीशराव कृ. चीरमोरे, किल्लेदार गडकरी, पारगड, व सौ. स्मिता सतीशराव चीरमोरे, किल्लेदार गडकरी, पारगड यांच्या हस्ते दि. २७/०२/२०२२ रोजी पार पडली. प्रारंभी किल्ल्याच्या पायथ्याशी चौकट व पायरी पूजन करून सुरुवात करण्यात आली. पुढं गडावरील ध्वज स्तंभ व ऐतिहासिक तोफांची पूजा झाल्यानंतर गडावरील अती प्राचीन मारूती मंदिरात पूजा करण्यात आली. गडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला चि. शिवराज सतीशराव चीरमोरे, किल्लेदार गडकरी, पारगड, व चि. कुलदीपराव दिलीपराव रायजादे, हारोलीकर सरकार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर गडावरील भव्य श्री भवानी मातेच्या मंदिरात देवीची ओटी भरून पूजा करून गार्हाणे घालून सांगता करण्यात आली. पौरोहित्य श्री. अशोक जोशी यांनी केले. या कार्यक्रमाला श्रीमंत रमेशराव केशवराव रायजादे, हारोलीकर सरकार, श्रीमंत सौ. सुचिता रमेशराव रायजादे हारोलीकर सरकार, श्री. शशिकांतराव महादेवराव चव्हाण पाटील वतनदार बेळगाव, व चि. ऋषभराव रमेशराव रायजादे यांची खास उपस्थीती लाभली. तसेच श्री. रघुवीर खंडोजी शेलार, श्री. प्रकाश चीरमोरे, श्री.दिनानाथ शिंदे, श्री प्रवीण प्रकाश चीरमोरे, श्री. अर्जून धोंडू तांबे आदी गडावरील मातब्बर मावळे मंडळी उपस्थित होती.