येथील हब्बनट्टी गावात श्रीकृष्ण मंदिराचे थाटात आणि उत्साहात उद्घाटन करण्यात आले. जवळपास तीन दिवस हब्बनहट्टी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी तिसऱ्या दिवशी नाटक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य आमदार परशुराम भाऊ नंदिहळ्ळी आणि डॉक्टर गणपत पाटील उपस्थित होते.
यावेळी गावकऱ्यांच्या हस्ते आणि परशुराम भाऊ नंदिहळ्ळी आणि डॉ गणपत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर गणपत पाटील म्हणाले की हब्बनट्टी गावातील नागरिक एकत्रित येऊन हा श्री कृष्ण मंदिराच्या उद्घाटनाचा समारंभ उत्साहात पार पडला त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो.
आपली भारतीय संस्कृती टिकून राहायचे असेल तर आपल्या सर्वांनी अशाच प्रकारे एकत्रित येणे गरजेचे आहे. आपल्या भारतात देवी-देवतांना खूप महत्त्व आहे. देवी-देवतांच्या आशीर्वादामुळेच आज आपण येथे आहोत.
आपल्या वयोवृद्धांसाठी सर्व तरुणांनी आपल्या संस्कृतीचा आदर्श घ्यावा. आणि आपली हिंदू संस्कृती टिकून ठेवावी असे आवाहन केले.याप्रसंगीमाजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी ,अनु गावडे ,संतोष कदम सोमाजी भरणकर बाबुराव भरणकर पुंडलिक पाटील मनोहर पाटील सत्यदेव नाईक निंगाप्पा बळगी बबन देवळी दत्ताराम घाडी रविंद्र गुरव पुंडलिक नाकाडी नींगो गवस
यांच्यासह देवस्की पंच मंडळी उपस्थित होते