बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या वतीने 2022-2023 वर्षासाठी मॅनेजिंग कमिटीच्या अधिकार ग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 मे रोजी सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेत तिसरे रेल्वे गेट हॉटेल संतोरोनी मध्ये पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्याचे प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस प्रसाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच बसवराज नालेगाव ए राजश्री मेनन यास्मिनबेगम वालीकर बी मेघण्णावर यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.