केए 22 सी 5384 या महानगरपालिकेच्या शववाहिकेचीअत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असून महानगर पालिकेचे देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे
सदर शववाहिकेची अवस्था पाहता महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी झोपी गेलेत की काय असा प्रश्न उद्भवतो आहे.या शववहिकेचे बाक, दरवाजे मोडकळीस आलेले निदर्शनास येत आहे.
तसेच याच्या दुरुस्तीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचे पाहायला मिळत असून नागरिक देखील शववाहिकेच्या झालेल्या दुरवस्थेबाबत संताप व्यक्त करत आहेत.