बेळगाव :
जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांचा आदेश
कोरोनामुळे जिल्ह्यातील रेणुकादेवी मंदिरांसह 9 मंदिरे जनतेला दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती .मात्र आज सोमवार दिनांक 31 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी कोरोनाचे नियम शिथिल करत मंदिर जनतेसाठी खुले करण्याचा आदेश बजावला आहे
सौदत्ती रेणुका देवी मंदिरासह जोगणभावी सत्यम्मा मंदिर,वीरभद्र देवस्थान गोडची रामदुर्ग,चिंचली मायक्का देवी मंदिर, पंत महाराज मंदिर बाळेकुंद्री,होळेम्मा देवी मंदिर बडकुंद्री,मल्लय्या देवस्थान मंगसुळी,
रेणुका देवस्थान कोकटनूर अथणी
बसवेश्वर देवस्थान खेडेगाव ही सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजाविला आहे .
यात्रा आणि महोत्सवांचे काळ आता कुठे सुरू होत आहेत. अशा काळात भक्तीची केंद्र असलेली मंदिरे बंद राहिली तर भाविकांची नाराजी निर्माण होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असून ही मंदिरे सुरू झाल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे.