राजहंस गडावर बांधण्यात आलेल्या सिद्धेश्वर देवस्थान चा कारभारात गैर प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे पुन्हा राजहंस गडावर अशाप्रकारे कोणताही गैरवापर कारभार कंत्राटदाराने करू नये याकरिता संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राजहंस गडावर शिवपुतळा बसविण्यासाठी कंत्राटदाराने कामे हाती घेतली आहेत मात्र हा शिवपुतळा बसविण्याआधी या ठिकाणी झालेल्या सिद्धेश्वर देवस्थानाच्या कारभारात जो गैरप्रकार आढळून आला आहे त्याची आधी चौकशी करावी मगच कंत्राटदाराने पुढील कामे हाती घ्यावी अशी मागणी राजहंस ग्रामस्थांनी केली
राजहंस गावात अनेक घोटाळे करण्यात आले आहेत येथील रेशन कमिटी आणि सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने भ्रष्ट कारभार करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे जोपर्यंत आता या गैरप्रकाराविषयी चौकशी होणार नाही तोपर्यंत कंत्राटदारांना कामे करू देणार नाही असा पवित्रा राजहंस गावातील नागरिकांनी घेतला आहे.