शिवाजी गल्ली गौंडवाड येथील दोन वर्षाची चिमुरडी अजूनही गेल्या आठ महिन्यांपासून बेपत्ता आहे. आरोही महादेव पवार वय वर्षे 2 असे तिचे नाव असून ती 16 ऑगस्ट 2021 मध्ये श्री क्षेत्र सोगल सोमनाथ येथून दुपारी अडीचच्या सुमारास हरवली होती.
त्यावेळी पवार कुटुंबीयांनी तिची याठिकाणी शोधाशोध केली मात्र तिचा शोध लागला नसल्याने त्यांनी मुरगूड तालुका बैलहोंगल येथील पोलीस स्थानकात या घटनेची नोंद केली आहे.
मुरगोड पोलीस सदर चिमुकलीचा तपास करत असून ती कोणालाही सापडल्यास त्यांनी 93 411015 36 किंवा 91 64 756 600 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .