सध्या लग्नसमारंभाच्या दिवस आहेत त्यामुळे महिलांनो सावध राहा. तुमच्यावर चोरट्यांची नजर आहे. चोरटे संधीचा फायदा घेऊन दागिने लंपास करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे लग्नसमारंभात दागिने घालून मिरवण्याऐवजी ते सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे
येथील बीके कंग्राळी मध्ये एका लग्नसमारंभात अशाच प्रकारे महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठन लांबविले ची घटना उघडकीस आली आहे. सदर महिलेने लग्नसमारंभात झालेली गर्दी पाहून आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून आपल्या बॅगमध्ये ठेवले. आणि गळ्यात खोटे दागिने घातले.
यावेळी सदर महिलेवर पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी महिलेच्या बॅगमधील अडीच तोळे सोन्याचे गंठण त्या न समजताच कधी लांबविले. यावेळी महिलेने जेवण झाल्यानंतर आपल्या सोन्याचे दागिने तपासले असता त्या ठिकाणी ते सापडले नसल्याने तिने हंबरडा फोडला.
यावेळी लग्न समारंभामध्ये एकच गोंधळ उडाला. याप्रसंगी तिच्या नातेवाईकांनी दागिन्यांची शोधाशोध केली मात्र ते कुठेही सापडले नाहीत.