यादगीरच्या जिल्हाधिकारीपदी बेळगाव च्या कन्येची नियुक्ती करण्यात आली आहे. स्नेहल रायमाने असे या बेळगावचचे आणि यादगिर च्या जिल्हाधिकार्यांचे नाव आहे.
स्नेहल रायमाने या आधी पीयूसी बोर्डाच्या संचालिका म्हणून काम पहात होत्या तर आता त्यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारच्या अंडर सेक्रेटरी जेम्स थारकन यांनी त्यांच्या बदली आणि बढतीची चा आदेश बजाविला असून त्या पोलिस अधिकारी कुबेर रायमाने यांच्या पुतणी आहेत.