ज्येष्ठ वकील मुकुंद परब यांचे निधन
भाग्यनगर येथील रहिवासी आणि ज्येष्ठ वकील मुकुंद परब वय 78 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले चार भाऊ एक बहिण नातवंडे असा परिवार आहे. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. तसेच माजी नगरसेवक किरण परब यांचे ज्येष्ठ बंधू होते. आज सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अनगोळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
ते बेळगाव मधील मराठी वकील संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुक्तांगण या शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघाचे अध्यक्ष यासह विविध पदावर ते अग्रभागी होते. तसेच त्यांनी अनेक सामाजिक कार्यात आपले मोलाचे योगदान दिले होते.