सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ व सुरेश यादव यांचा आज सत्कार करण्यात येणार आहे शिवबसव नगर येथील कारंजी मठात 252 वा अनुभव आणि अथणी चे महातपस्वी मुरुग्रेन्द्र शिवयोगी लिंगैक्य शतनाहोत्सव कार्यक्रमात हा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम आज सायंकाळी सहा वाजता पार पडणार असून चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तसेच या कार्यक्रमांमध्ये साहित्यिक डॉक्टर बसवराज जगजंपी यांचे अथणी मुरुग्रेन्द्र शिवयोगी यांच्या जीवनावर व्याख्यान होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कारंजी मठातर्फे करण्यात आले आहे.