सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर अस्वच्छता पसरली आहे.तसेच या पिण्यासाठी शौचालयासाठी तसेच राहण्यासाठी पैसे आकारले जात आहेत.याचबरोबर दर्शना करिता देखील भरमसाठ पैसे आकारले जात आहेत . आणि या पैशातून भ्रष्ट कारभार करण्यात येत आहे. त्यामुळे यल्लमा डोंगरावर चालत असलेला हा भ्रष्टाचाराचा कारभार लवकरात लवकर थांबवावा याकरिता जय भिम ओम साई संघटनेच्यावतीनेआणि देवस्की महिलांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी त्यांनी या निवेदनात यल्लमा डोंगरावर प्रथमतः स्वच्छता करण्यात यावी आणि या ठिकाणी दर्शनाकरिता भरमसाठ आकारण्यात येणारा पैशांमध्ये सवलत द्यावी अशी मागणी केली आहे.
यल्लमा डोंगरावर स्वच्छतेचा अभाव आहे. त्यातच सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते. याचबरोबर मंदिराला आलेल्या देण्याची मध्ये भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देवस्की महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.