ज्या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थांनी आपला बराच काळा घालवून आपल्या अमृत स्पर्शाने संजीवन केलेला वटवृक्ष समृद्ध केला . त्याच वटवृक्षाच्या आशीर्वादाने नैसर्गिकरीत्या अलग झालेल्या फांदीपासून स्वामी समर्थ महाराजांच्या नयनरम्य पादुका तयार करण्यात आल्या आहेत.आणि या स्वामी समर्थांच्या संजीवन पादुका आज गुरुपौर्णिमेनिमित्त बापट गल्ली कार पार्किंग येथील मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी सकाळी. राजेंद्र गायकवाड यांच्या घरापासून पादुकांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मंदिरात लघुरुद्राभिषेक करण्यात आला. तसेच पादुकांवर अभिषेक घालण्यात आला. यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकावर राजेंद्र गायकवाड आणि जितेंद्र रजपूत या दांपत्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
तसेच उद्या गुरुवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी गण होम आणि दुपारी आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.