गुरुपौर्णिमेनिमित्त येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान ज्योतिबाला सकाळी लघुरुद्राभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरात पौर्णिमेनिमित्त सत्यनारायणाची पूजा देखील करण्यात आली.
यावेळी दुपारी महाआरती करून देवाला नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर गुरुपाद्य पूजा करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दुपारनंतर मंदिरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.