कर्नाटक स्टेट लायसन्स इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची राज्यपातळीवरील बैठक रविवार दि. १७ रोजी बंगळूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व ऊर्जामंत्री सुनीलकुमार उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२ वा. पॅलेसग्राऊंड, श्री रमन महर्षी रस्ता, रॉयल सिनेट येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला बेळगावमधील कॉन्ट्रॅक्टर उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. पॅकेज टेंडरींग, इलेक्ट्रिफिकेशन ऑफ लेआऊट्स ऑथराईज आणि अन ऑथराईज, सर्व्हर आणि सॉफ्टवेअर संबंधीच्या समस्या यासह विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीत संघटनेच्या नूतन सदस्यांचा सत्कार केला जाणार आहे. बेळगावचे कंत्राटदार विलास गोस्वामी यांची हेस्कॉमवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात त्यांचाही सत्कार केला जाणार आहे. या बैठकीला सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे