होसूर शहापूर येथील मराठी मुलांची शाळा क्रमांक ८ मध्ये पौरवाल बंधू कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात आली. किरण हिराचंद पौरवाल व संजय हिराचंद पौरवाल या बंधूंनी सदर शैक्षणिक मदत शाळेला दिली आहे.
आपले आई वडील कै हिराचंद व कमलाबाई पौरवाल तसेच लिंकित किरण पौरवाल यांच्या स्मरणार्थ सदर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. पेन, कंपास वहया पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस डी पाखरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरीश नेसरकर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका किरण गायकवाड यांनी पौरवाल कुटुंबीयांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कुटुंबीयातर्फे संजय पौरवाल शांतीलाल पौरवाल हेमराज जैन, रौनक पोरवाल, कलावती जैन, चंद्रिका जैन मुस्कान पौरवाल उपस्थित होते तसेच शाळेतील एल शेगडी व एसडी नरसणावर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी मानले यांनी केले