महिला विद्यालयाच्या सभागृहात दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे तसेच शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याधिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच यंदा प्रथमच शहरातील एका शाळेला महात्मा फुले आदर्श विद्यालय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम मराठी प्रेरणा मंचतर्फे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला बेळगाव इन्कम टॅक्स विभागाचे सहाय्यक अमित शिंदे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच या आयोजित केलेल्या कार्यक्रमात बेळगाव शहर तालुका व खानापूर तालुक्यातील सर्वोत्तम प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.