बेळगाव येथील चित्पावन ब्राह्मण संघाचा सुवर्ण महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला 1975 साली या संघाची स्थापना झाली, त्याला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने बेळगाव मधील समस्त चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांनी सुवर्ण महोत्सव समारंभाचे आयोजन केले होते .
सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम दिनांक 10 व 11 जानेवारी 2026 रोजी मराठा मंदिर येथे झाला
या सोहळ्यानिमित्ताने शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता, सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन यांच्या सुश्राव्य सुगम संगीताचा कार्यक्र झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन गोगटे इन्फ्रास्ट्रक्चरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.माधवजी गोगटे यांच्या हस्ते झाले
रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता ब्रीजजवळच्या मारुती मंदिरापासून मराठा मंदिरापर्यंत शोभायात्रेने दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली
त्यानंतर पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक व सांगली अर्बन को. ऑप. बँकेचे चेअरमन श्री.गणेश हरी गाडगीळ यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री.सुधीरदादा गाडगीळ हे उपस्थित होते
मुंबईचे कॉर्पोरेट कीर्तनकार श्री. समीर लिमये यांचे काळाशी सुसंगती लावणारे दासबोधा वरील निरुपणझाले . याचवेळी सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले
शेवटच्या सत्रामध्ये बेळगाव मधील चित्पावनी कलाकारांकडून करमणुकीचे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आली . या सर्व कार्यक्रमांचे संयोजन आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध साहित्यिका मेधा मराठे यांनी केले .त्यात ‘ स्वामी ‘ आणि ‘ वाऱ्यावरची वरात ‘ यातील संपादित प्रवेश, ‘ खरवस’ आणि ‘ किलबिल’ हे छोट्यांचे कार्यक्रम, ‘ आदिदेव ‘ हा भगवान शंकरच्या प्रार्थनेवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम, मंगळागौरीचे खेळ आणि ‘ विच्छा माझी पुरी करा ‘ या लोकनाट्याचा नृत्यासह संपादित भाग असा भरगच्च कार्यक्रम झाला



