महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कन्नड सक्ती विरोधात व मराठी परिपत्रके मिळविण्यासाठी ९ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी तालुका म. ए. समितीची बैठक शनिवार दि. ३० जुलै रोजी दुपारी १ वाजता ओरिएंटल स्कूल, गोवावेस येथे बोलविण्यात आली आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी, आजी माजी लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.