शहरात अपघाताची संख्या वाढत चालली आहे. आज पुन्हा एकदा शहरालगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एका सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
साजिद मुल्ला वय सहा असे अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव असून सदर अपघात हत्तरगी नजीक झाला आहे. तसेच या अपघातात अन्य पाच जण जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मुल्ला कुटुंबीय साताराहून वडूज गावात आज सकाळी साडेआठच्या सुमारास एस्टीम कारने कित्तूर येथे अंत्यसंस्कारासाठी जात होते. यावेळी हा अपघात घडला.
यावेळी या घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच साजिद मुल्लाचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करिता तसेच जखमींना अधिक उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले.