गोशामहल (तेलंगाणा) विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना २५ ऑगस्ट रोजी झालेली अटक करून जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास दिला जात आहे.
तेलंगणा सरकारची ही कृती राज्यघटना आणि कायदा विरोधी असून नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे हनन करणारी आहे; म्हणून टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी केंद्र शासन आणि तेलंगाणाचे राज्यपाल यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी आज चंदगड येथील संभाजी चौक येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली.
‘टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी त्यांची कारागृहातून मुक्तता करावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री यांनी केली.
त्यासंदर्भातील स्वाक्षरींचे निवेदनही चंदगडचे तहसीलदार श्री. राणावरे यांना देण्यात आले.
या आंदोलनात हिंदुराष्ट्र सेना चंदगड, श्री राम सेना चंदगड, सनातन संस्था या संघटना तसेच तालुक्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ युवकांनी सहभागी होते. आंदोलनातील मागण्यांवर अनेक हिंदुत्ववाद्यांनी स्वाक्षऱ्या करून आंदोलनातील मागण्यांना आपला पाठिंबा दर्शवला.