महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवार 5 जानेवारी रोजी चांगळेश्वरी प्राथमिक शाळा, सरकारी प्राथमिक शाळा येळ्ळूर , येळ्ळूर मॉडेल शाळा आणि येळ्ळूरवाडी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
प्रथमतः चांगळेश्वरी प्राथमिक मराठी शाळेमध्ये युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, शाळेचे शिक्षक श्री पाटील यांनी युवा समितीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत आणि कौतुक केले, शाळेत युवा समितीचा उपक्रम हा आम्हाला एक मराठी भाषेचा अभिमानाचा आहे असे त्यांनी आपले विचार मांडले, सिद्धार्थ चौगुले यांनी युवा समितीच्या उपक्रमाची माहिती दिली आणि मराठी भाषा, शाळा आणि परंपरा वृद्धिंगत व्हावी यासाठी युवा समिती कायम अग्रेसर असेल आपले विचार मांडले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि युवा समितीचे सहकारी उपस्थित होते.
सरकारी मराठी प्राथमिक शाळेत युवा समितीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थाना साहित्य वाटप करण्यात आले, तसेच नागेश बोभाटे यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद करून येत्या काळात पटसंख्या वाढवण्यासाठी काम करण्याची चर्चा झाली.
युवा समिती अध्यक्ष शुभम दादा यांच्या उपस्थितीत सरकारी प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर सर यांनी सर्वांचे स्वागत करून युवा समितीच्या कार्याने आज मराठी शाळांना एक भक्कम आधार आणि भरभराट मिळत आहे, पटसंख्या वाढीचे श्रेय हे युवा समितीच्या उपक्रमांना जाते असे आपले विचार मांडले, यावेळी उपस्थित येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष श्री सतीश पाटील यांनी मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळा जगवन गरजेचं आहे आणि ते ओळखून युवा समितीचा हा उपक्रम कार्यक्षम ठरल्याचे त्यांनी प्रतिपादन केले, “आपल्या मराठी शाळा ह्या आमच्यासाठी सर्वस्व आहेत, मराठी शाळांची पडझड होतानाच 4 वर्षांपूर्वी पाहिले आणि आम्ही संघटनेत निर्णय घेतला की मराठी भाषा टिकवायची असेल तर आपण मराठी शाळा जगवण्यासाठी कार्य करायला हवं त्या दिवसापासून झालेला हा निर्धार जवळपास सीमभागाततील150 शाळांमध्ये आपण कार्यरत आहोत, या शाळा आपल्या मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवतील” असे वक्तव्य युवा समितीचे अध्यक्ष श्री शुभम दादा शेळके यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि युवा समितीचे सहकारी उपस्थित होते.
सरकारी प्राथमिक मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे युवा समिती तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला, कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती फोटो पूजन व द्विप प्रज्वनाने करण्यात आली, शाळेच्या मुख्याध्यापिका निलजकर टीचर यांनी युवा समितीचे शैक्षणिक उपक्रम हे बेळगावातील मराठी शाळांच्या अभिवृद्धी साठी निर्णायक ठरले आहेत, गतवर्षी पेक्षा शंभर विद्यार्थी वाढले आहेत आणि याच खारीचा वाटा हा युवा समितीचा आहे त्यांचे हे कार्य मोठ्या प्रमाणात वाढत जावो असे त्यांनी आपले मत मांडले, युवा समिती अध्यक्ष श्री शुभम दादा शेळके यांनी युवा समितीच्या उपक्रमाची माहिती दिली, मराठी शाळेच्या विकासासाठी आम्ही कार्यरत राहू तसेच, येळ्ळूर येथील सर्व शाळा पाहून आमचे मन भरून येत असे आपले मत मांडले, सचिव श्रीकांत कदम यांनी उपक्रमांची माहिती देऊन या उपक्रमासाठी आर्थिक आणि शैक्षणिक साहित्य पुरवणाऱ्या सर्व युवा समितीच्या हितचिंतकांचे आभार मानले,
यावेळी शाळेतील शिक्षकवृंद पालक, युवा समिती पदाधिकारी उपाध्यक्ष सचिन केळवेकर, किरण धामणेकर, नागेश बोभाटे, शुभम जाधव, प्रतीक पाटील, सिद्धार्थ चौगुले, जोतिबा पाटील, आशिष कोचेरी, रोहन शेलार, शुभम पाटील,पूजा मजुकर, साक्षी गोरल, वैष्णवी मंगनाईक, कीर्ती गोरल, ऋतुजा पाटील, निकिता पाटील आदी उपस्थित होते.