No menu items!
Monday, December 23, 2024

देशविरोधी कृतींना पाठिंबा देणाऱ्या ‘ हलाल प्रमाण पत्राला ‘ संधी देणार नाही! – श्री रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

Must read

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदू राष्ट्र अधिवेशनाचा दुसरा दिवस यशस्वी रीतीने संपन्न !

बेंगळुरू : देश विरोधी कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या ‘ हलाल प्रमाण पत्राला’ संधी देणार नाही, असे हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे यांनी स्पष्ट केले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले 200 पेक्षा अधिक हिन्दू कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री रमेश शिंदे म्हणाले की, भारताला हलाल मुक्त करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. देशात सेक्युलर वाद मांडण्यात येतो. 1976ला आणीबाणीच्या वेळी भारताला धर्म निरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केले आहे तर 2025 ला ते काढणे शक्य आहे. संविधानानुसार 20 टक्के असलेल्यांना अल्पसंख्यांक, सचिव आहेत, तर 80 टक्के लोकांसाठी स्वतंत्र सचिव का नाहीत? इथे समानतेचा अधिकार कुठे आहे ? त्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा आग्रह धरला पाहिजे.

भारतीय सेनेत पाश्चात्य पद्धतींचे अनुकरण थांबवा ! अधिवक्ता रविशंकर एस. एस.
स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी आज देखील 300 वर्षे जुनी आसलेल्या ब्रिटिश पद्धतीचे अनुकरण करण्यात येत आहे. त्याविषयी पत्राच्या आधारे मान्य पंतप्रधानांना विनंती करण्यात आली. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून सेनेच्या काही चिंन्हामध्ये पालट करण्यात आल्याचे दिसून येते. भारतीय सेनेला सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या अनुयायांनी अपूर्व देणगी दिली आहे; परंतु कुठेही हा उल्लेख दिसत नाही. त्यासाठी आपण सर्वांनी शासनाला आग्रह केला पाहिजे.

हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत हा लढा थांबणार नाही! – श्री. गुरूप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती.

हिंदु राष्ट्राची मागणी म्हणजे केवळ संविधनिक पालट नसून आम्हाला धर्माच्या आधारावर हिंदु रा्ट्राची स्थापना करणे अगत्याचे आहे. देशाचा विकास होत आहे, म्हणजे देशाची प्रगती होत आहे, असे म्हणणे शक्य नाही. आम्हाला रामाराज्या सारखे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व हिंदु संघटनांनी संघटितपणे लढा देणे आवश्यक आहे.

राष्ट्र धर्माचे श्री. संतोष केंचांबी बोलतांना म्हणाले – आपले आत्मस्थैर्य नष्ट करणारे सेक्युलरवाद्यांचे षड्यंत्र ओळखून हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. हिंदूंनी हिंदु धर्मात सांगितल्या प्रमाणे धर्माचरण केले पाहिजे. सध्याच्या काळात प्रभावी आसलेल्या सोशल मीडियाचा वापर करून धर्म जागृतीचे कार्य करूया.

सनातन संस्थेचे धर्म प्रचारक संत पू. रामानंद गौडा म्हणाले की, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणाऱ्या हिंदूंनी आध्यात्मिक बळ वाढविले पाहिजे. आजच्या परिस्थितीत चीन अथवा पाकिस्तानशी कधीही युद्ध होऊ शकते. देशाच्या आत देखील गल्ली -:गल्लीत, रस्त्या

  • रस्त्यावर बसून भारताच्या विरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. पुढे अतिवृष्टी, अनावृष्टी, वादळ, भूकंप अशी स्थिती निर्माण होऊ शकते, असे अनेक द्रष्ट्या संतांनी आधीच सांगितले आहे. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळात रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक साधना उत्तम रीतीने केली पाहिजे.
    शेवटी उपस्थित सर्व हिंदु बांधवांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा केली. संपूर्ण वंदे मातरम् म्हणून अधिवेशनाची सांगता करण्यात आली.
  • आपला विश्वासू

श्री. मोहन गौडा,
राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
संपर्क : 7204082609

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!