बेळगाव रेल्वे स्थानकाचे उदघाटन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाल्याने, दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावला येणार आहेत, त्या दरम्यान प्रलंबित सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी व वर्षानुवर्षे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाची आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या व्यथा पंतप्रधानासमोर मांडण्यासाठी पंतप्रधानाच्या नियोजित दौऱ्यात म. ए. युवा समितीच्या शिष्ठमंडळाला भेटीसाठी वेळ द्यावा यासाठी पंतप्रधान कार्यालयालाशी म. ए. युवा समितीने पत्रव्यवहार केला आहे. सदर पत्र पंतप्रधान कार्यालयाने स्वीकारून पंतप्रधानांच्या सचिवांकडे वर्ग केला असल्याची माहिती युवा समितीला इमेल मार्फत दिली आहे.
मागील महिन्यात हा दौरा होणार होता त्यावेळी सुद्धा अशी मागणी करण्यात आली होती, पण रेल्वेस्थानकाचे उदघाटन लांबल्याने पंतप्रधान बेळगावला येऊ शकले नाहि. आता २७ फेब्रुवारी हि तारीख निश्चित झाल्यामुळे पुन्हा एकदा भेटीसाठी वेळ मिळावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे.