‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा असूनविविध ठिकाणांहून विविध कार्यक्रमांना चित्रपटाच्या टीमला आमंत्रित केले जात आहे. अशाच एका हिंदू एकता यात्रेत जाताना द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक देखील तिच्या सोबत होते. मात्र सुदैवाने कसलीही गंभीर इजा झाली नसल्याची अपडेट अदा शर्माने ट्वीट करत दिली.