अवघ्या एक महिना झालेल्या नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव मध्ये घडली आहे. शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांचा मुलगा प्रतीक याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
प्रतीक प्रकाश शिरोडकर वय 29 असे आत्महत्या केलेल्या नववराचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
त्याचे लग्न होऊन अवघा एक महिना झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी आई-वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. कोनवाळ गल्ली येथून त्याची अंत्ययात्रा निघणार असून अंत्यसंस्कार आज दुपारी अडीच वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी मध्ये करण्यात येणार आहे.