महिला विद्यालय हायस्कूलची विद्यार्थिनी कु. साक्षी सतीश रत्नोजी या विद्यार्थिनीने शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 39 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून या विद्यार्थिनीस तिचे कुस्ती कोच श्री काशीनाथ पाटील तिचे आई वडील, शाळेचे शारीरिक शिक्षक श्री भरमा तुपारे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ पाटील सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.